गावाची ग्रामपंचायत

माणगांव हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. माणगांव हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 17 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 30 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये २४ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या 6725 इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये नऊ प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये सरपंच व 15 कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधीकारी व १६ कर्मचारी आहेत.

प्रेक्षणीय स्थळे व माहिती

मनोहर-मनसंतोषगड शिवापूर

श्री देवी यक्षिणी मंदिर

जोळकवाडी धबधबा

सावंतवाडी तलाव

ध्यानगुहा

दत्त मंदिर